#Natepute:नातेपुते येथील समाज रत्न राजेंद्र पाटील यांचे निधन


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुतेचे  ग्रामदैवत शंभू महादेवाचे प्रमुख मानकरी, नातेपुतेकरांनी ज्यांना समाजरत्न या पुरस्काराने आदराने गौरवले असे राजेंद्र भाऊ पाटील(वय ७२)यांचे  दुःखद निधन झाले आहे.

देशी गाई आणि बैल हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. गाई पाळली पाहिजे हे फक्त सांगितले नाही तर प्रत्यक्षात शेकडो गाईंची संगोपना केली. शेवटच्या श्वासापर्यंत काळ्या मातीत रमले. अत्यंत कमी वयात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून आदर्श कुटुंब प्रमुख झाले. प्रसिद्ध मल्ल म्हणून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात आदराने उल्लेख केला जायचा. चैत्र यात्रेत संपूर्ण पंधरा दिवस कवडीची व शंभू महादेवाची अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. सर्वांना हेवा वाटावं असे हे व्यक्तिमत्त्व होतं.
त्यांच्या अकस्मात जाण्याने नातेपुतेकरांना घरातील एक कर्ती व्यक्ती गेल्याचे दुःख जाणवत आहे.त्याच्या मागे पत्नी,  एक मूलगा ,चार मूली असा परीवार आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम