Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:महिलांनी आत्मनिर्भर आणि धाडसी होण्याची गरज - संस्कृती राम सातपुते


महादरबार न्यूज नेटवर्क -
महिलांनी घरातून बाहेर पडून आपले वेगळे अस्तित निर्माण केले पाहिजे, तसेच महिलांनी आत्मनिर्भर आणि धाडसी होणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी संस्कृती राम सातपुते यांनी बोलताना व्यक्त केले.त्या नातेपुते (ता माळशिरस ) येथील होम मिनिस्टर कार्यक्रमात बोलत होत्या .क्रांती मळेगावकर सोबत महिलांचे विविध खेळ झाले यातून निवडल्या गेलेल्या क्रमांकांना विविध बक्षिसांचे वितरणही यावेळी करण्यात आली .
              
यावेळी हजारो महिलांनी होम मिनिस्टर कार्यक्रमात भाग घेऊन गप्पा, गाणी, रंजक खेळ व प्रभू रामचंद्राच्या गाण्यावर ठेका धरत मनसोक्त आनंद घेतला.
अनेक खेळ संपन्न झाले. या खेळातून विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. तसेच लकी विजेत्यांसाठी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पैठणी साड्या आदींची करण्यात आली .


अनिता भोसले लकी विजेत्या

मनीषा बिचुकले ,अश्विनी करडे कदमवाडी ,स्नेहल कोळेकर कचरेवाडी, मेघा  चोरमले खुडूस, आशा  होळ मांडवे,श्रुती राक्षे नातेपुते, कोमल काळे नातेपुते या ठरल्या.या सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार  रामभाऊ सातपुते व सौ. संस्कृती सातपुते यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments