#Natepute:छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दहीगांव येथे अनोळखी व्यक्तींकडून स्थापना
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यात दहीगांव हद्दीत कळबोली शिखर शिंगणापुर या मार्गावरील चौवेचाळीस फाटााया ठिकाणी असलेल्या छञपती शिवाजी चौक येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अनोळखी लोकांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना केली. शिवजयंतीच्या निमित्ताने या पुतळ्यांची स्थापना केल्याने परीसरात आंनदोउत्सव साजरा करण्यात आला.
सोमवारी सकाळी ही घटना दहीगांवसह, नातेपुते परिसरात पसरली आणि तासाभरातच नातेपुते, दहीगांव,शिदेवाडी कारूडे, ,जाधववाडी, धर्मपुरी, मोरोची, , पिरळे, गावातील समाजबांधव जमत 'जय भवानी,जय शिवाजी, छञपती शिवाजीाामहाराज कि जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.याप्रसंगी नातेपुते,दहीगांव,कदमवाडी, शिदेवाडी,पिरळे, कारूडे, , धर्मपुरी, मोरोची, देशमूखवाडी, या गावांतील बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंतीच्या निमित्ताने छञपती शिवाजी महाराजाच्या पूतळ्याची स्थापना केल्याने परीसरातील हजारो समाज बांधवाने पूतळ्याचे दर्शन घेऊन पूष्पहार अर्पण केले
Comments
Post a Comment