महादरबार न्यूज नेटवर्क - मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या विचारधारेने कार्यरत असलेल्या नवमहाराष्ट्र विडी कामगार व कर्मचारी संघटना,सोलापूर या संघटनेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी मोरोची ता.माळशिरस येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली देशमुख यांची निवड करण्यात आली.सदरील निवडीचे पत्र शिवसेनेचे प्रमुख सचिव संजयजी माशेलकरसाहेब यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळी,शिवसेना जिल्हाप्रमुख महेशजी चिवटेसाहेब, जिल्हाप्रमुख चरण राज चवरे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे माळशिरस शिवसेना नेते राजकुमार हिवरकर पाटील,निशांत तेग्गेळी,राजू जाधव,पिरळे शाखाप्रमुख आकाश खिलारे उपस्थित होते.
बांधकाम कामगारांची नोंदणी करणे त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे,अपघाती मृत्यू झाल्यास मदत मिळवून देणे.घरकुल योजना,शैक्षणिक,आरोग्य विषयक,आर्थिक तसेच सामाजिक लाभ मिळवून देणे.बांधकाम कामगारांच्या आपत्यांना वैद्यकीय अभ्यासासाठी आर्थिक मदत,कामावर अपंगत्व अथवा मृत्यू झाल्यास मदत मिळवून देणे.अशाप्रकारे सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देण्यासाठीची जबाबदारी तालुकाध्यक्षपदी निवड करून ज्ञानेश्वर उर्फ माऊली देशमुख यांच्यावर देण्यात आली.
0 Comments