Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat दौंड पत्रकार क्रिकेट संघाचा तालुक्यातील राजकीय नेते संघावर रोमहर्षक विजय


महादरबार न्यूज नेटवर्क -
दौंड तालुक्यातील राहू येथे दौंड तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती स्व. बाबूराव वामनराव कुल आणि स्व. आमदार सुभाष अण्णा बाबूराव कुल यांच्या स्मरणार्थ श्री शंभू महादेव प्रतिष्ठान राहू (ता. दौंड) यांच्या वतीने 'आमदार चषक २०२५' या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार राहुल कुल हे उपस्थित झाले होते.


या स्पर्धेमध्ये दौंड पत्रकार विरुद्ध दौंड तालुक्यातील राजकीय नेते मैत्रीपूर्ण क्रिकेट लढती झाल्या. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दौंड पत्रकार क्रिकेट संघाने दौंड तालुका राजकीय नेते संघावर पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पत्रकार संघाने ५ षटकांत ५१ धावा केल्या. राजकीय नेते संघाला ५ षटकांत ४६ धावा करता आल्या. पत्रकार संघामध्ये प्रकाश शेलार, विशाल धुमाळ, संदीप सोनवणे, संदीप नवले, संतोष काळे, संदीप भालेराव, राहुल अवचट,नितीन गव्हाणे सुमित सोनवणे, नीलेश जांबले, अतुल बोराटे, वजीद बागवान, बापू नवले,यांनी सहभाग नोंदवला.


राजकीय संघाकडून जयदीप सोडनवर, दिनेश भुजबळ, गणेश चव्हाण, शरद कोळपे, अशोक हंडाळ, रमेश थोरात, सुखदेव चोरमले, दिगंबर मगर, निखिल चव्हाण आदी सहभागी झाले होते. या सामन्याचे पंच म्हणून संदीप चव्हाण यांनी काम पाहिले. या सामन्याचे समालोचन ऋषी पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments