Hot Posts

6/recent/ticker-posts

#Solapur दयानंद शिक्षणशास्र महाविद्यालयाची प्रार्थना फांऊडेशनला क्षेञभेट

   
महादरबार न्यूज नेटवर्क -
दयानंद शिक्षणशास्र महाविद्यालय संचलित यशवंतराव चव्हाण मूक्त विद्यापीठ अतर्गत येणार्या  व्दितीय वर्ष बी.एड.काॅलेजच्या विद्यार्थाची क्षेत्रभेट नूकतीच मोरवंची ता.मोहोळ  येथील प्रार्थना बालग्रामला      संपन्न झाली.         

मोरवंची येथील प्रार्थना फाऊंडेशन संचलित प्रार्थना बालग्राममध्यै ६५ बेघर बालक व  वयोवृद्ध महीला पूरूष राहत असून याना जेवण,राहणे,कपडे,दवाखाना याची सोय मोफत केली आहे. शेतकरी
आत्महत्याग्रस्त,कूंटूबातील वंचित,बेघर,निराधार,    दीन, दलित,वंचित, निराधार,अनाथ यांना या संस्थेत आधार दिला जातो .प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, अनाथ, निराधार, स्थलांतरित, बेघर, निराधार व वंचित मुलांसाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प चालवला जातो. कित्तेक शेतकरी आज कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या करत आहेत त्या मुळे त्याच्या पश्चात कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत. मुलांचे शिक्षण थांबले जाते जो शेतकरी संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याच्या मुलांना शिक्षण मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून त्या कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे तसेच कित्तेक मूल अनाथ आहेत त्यांना शिक्षण मिळत नाही, कित्तेक मुलं वंचित आहेत, निराधार आहेत म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना बालग्राम ची सुरुवात करण्यात आली.

स्थलांतरित भटक्या, भिक्षा मागणाऱ्या, फुटपाथवर राहणाऱ्या,शाळेत न जाणाऱ्या, बालकामगार, बालमजूर मुलांसाठी वंचतांची शाळा एक पाऊल प्रगतीकडे हा प्रकल्प चालवला जातो या प्रकल्पाच्या माध्यमातून या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांना खेळाच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो, त्यांच्यासाठी संस्कारवर्ग घेतले जातात, मुलांच्या सहली काढल्या जातात, त्यांना विविध टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे ट्रेणींग दिले जाते. यावेळी प्रा,डाॅ.पद्दश्री भोजे, डाॅ. किसन शिंदे,डाॅ.पन्हाळकर, पवार आदि मार्गदर्शक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments