Hot Posts

6/recent/ticker-posts

#Piliv भारतीय जनता पार्टी महायुती पुरस्कृत व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल ची स्थापना


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे मा.आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या सर्वानुमते श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलच्या अध्यक्षपदी प्रमोद  भैस व सचिव पदी अतुल नष्टे यांची निवड करण्यात आली.
          
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर  श्री गणेश दर्शन व ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पगुच्छ घालण्यात आला.
          
यावेळी बोलताना अध्यक्ष प्रमोद भैस म्हणाले या पॅनलचा उद्देश हा फक्त पिलीव चा विकास  आहे . या पॅनलच्या माध्यमातून येणारी ग्रामपंचायत निवडणूक  मा.आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली लढविणार आहे .

यावेळी डॉ निलेश कांबळे, प्रवीण वाघमारे , भाजपा नेते शिवराज पुकळे, बाजीराव जाधव, अनंत जामदार, संकेत देशमुख, शिवम घोंगडे, राहुलसिंग रजपूत ,अंकुश भैस ,मयूर भैस ,सागर भैस प्रदीप चोबे, मनोजकुमार गुजरे , संकेत देशमुख ,श्रीशैल्य जंगम, प्रवीण माने, सुशील करडे, राहुल चोबे ,दत्तात्रय जनवर, अजित भैस,  तानाजी सुळे ,कुबेर भैस, संतोष रेळेकर, जयशिव गलांडे,विजय भैस, फिरोज शेख, संजय नाईक,इकबाल जमादार विनायक चोबे ,सुरज जामदार, सुनील भिसन,आप्पा भैस,दिगंबर भैस,यश उरवणे, राम गलांडे,यांच्यासह भाजपा तसेच श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
          
या नवीन श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलच्या स्थापनेमुळे पिलीवची राजकीय समीकरणे बदलणार असून, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .

Post a Comment

0 Comments