महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेचे फार मोठ्या प्रमाणात जाळे आहे परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळांना भेटी देत असताना किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या येताना मुलींना रोड रोमण्याचा त्रास शाळेच्या बाहेर एसटी बस स्थानकावर एसटी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत मोटरसायकल वरून कर्णकर्ता आवाज करीत मुलींच्या मागे पुढे फिरताना दिसतात याबाबत या तक्रारी अनेक महिला पालकांकडून शिवसेनेकडे प्राप्त झाल्या असल्याकारणाने मी दि.५/४/२०२४ रोजी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब गटशिक्षणाधिकारी तत्कालीन डीवायएसपी भोरे मॅडम यांच्यासह माळशिरस तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी निर्भया पथकातील सर्व कर्मचारी वृंद आणि त्याचबरोबर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती.
त्याच धर्तीवर आताही परिस्थितीत हाता बाहेर जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने श्रीमती सुषमा महामुनी मॅडम गटशिक्षणाधिकारी माळशिरस यांना राजकुमार हिवरकर पाटील शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले राज्यामध्ये नवदुर्गेच्या नवरात्राच्या महोत्सवाच्या दरम्यान वरील बैठकीचे नियोजन करावे आयोजन करावे व नारीशक्ती सशस्त्र होण्यासाठी जिजाऊ सावित्रीच्या लेकीसाठी प्रशासन सक्षम रीत्या त्यांच्या पाठीशी उभेआहे.याची प्रचिती येण्यासाठी त्याच बरोबर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्याही गोष्टीला पाठीशी घातलं जाणार नाही याची खबरदारी म्हणून बैठकीचा तात्काळ आयोजन करावे अशी निवेदनाद्वारे मागणी राजकुमार हिवरकर पाटील यांनी गटशिक्षण अधिकारी त्याचबरोबर श्री रघुनाथ पांढरे गट विकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती व श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनाही देण्यात आले.
0 Comments