Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune योगेश महादेव पवार छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सोशल बबल्स प्रा. लि. पुरस्कृत छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार २०२५  पुणे शहरातील प्रसिद्ध पवार बासुंदीवालेचे मालक योगेश पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
    
पुणे येथील फोर पॉइंट्स बाय शेराटन हॉटेल, विमाननगर येथे शनिवार (दि.१३) रोजी पार पडलेल्या सोशल बबल्स प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार २०२५ चा पुरस्कार प्रसिद्ध पवार बासुंदीवालेचे मालक व उद्योजक योगेश पवार यांना प्रदान करण्यात आला. उद्योजक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. कष्ट, चिकाटी आणि दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्र आज उद्योजकतेत पुढे जात आहे. ह्या उद्योजकतेचा गौरव करण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    
योगेश पवार यांनी स्वबळावर कष्टातून पवार बासुंदीवाले सारखा उद्योग उभा केला. उत्तम दर्जा, गुणवत्ता आणि ग्राहकांना प्रामाणिक सेवा दिल्याने अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरून त्यांनी हा उद्योग मोठा केला. ग्राहक सेवा आणि गुणवत्ता उत्कृष्टता यामुळे त्यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments