Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी ६,२०० रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये दीपक जनार्दन चव्हाण राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण पंढरपूर रोड वरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोलपंप येथे दि.१/१०/२०२५ रोजी दुपारी ०३.५० वा सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोलपंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH-06-CG-5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत ४००० रुपयचे डिझेल भरायचे आहे व ६२०० रु आम्हांला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हांला माझे फोन पे वरून १०,२०० रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हांला डिझेल नको ६२०० रु रोख द्या अशी विनंती केली त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन ६२०० रु मोजले त्यामध्ये ५०० रु दराच्या १२ व १०० रु दराच्या २ असे ६२०० रु बाजुला काढले व बाकी पैसे खिशात ठेवले. व पुन्हा मी पैसे मोजत असताना ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने माझे हातातील ६२०० रु हिसकावुन घेऊन पळून गेले वगैरेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२),३(५), अन्वये गुन्हा दाखल होता... सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री महादेव कदम नातेपुते पोलीस ठाणे हे करत होते..

सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे  गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हे बारामतीकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली असता तात्काळ मालेगाव (बारामती) पोलीस ठाण्याची मदतीने क्रमांक १) आकाश प्रकाश शिंदे वय २४ वर्ष राहणार सावकार गल्ली मोरेवाडी प्लॉट नंबर दोन, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर २) नवनाथ किसन सरगर वय ३० वर्ष राहणार करगणी, तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतले सदर गुण्याबाबत विचारले असता गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांचा पोलीस ठाणे येथे अभिलेख तपासला असता त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली  तसेच धाराशिव जिल्हा येथे चोरी व रॉबरी चे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे सदर आरोपीत यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून सध्या सदर आरोपी हे लॉकअप मध्ये बंद आहेत...! तसेच सदर गुन्ह्यात हिसकावून घेऊन गेलेल्या रकमेसह १०,००,७००,/ रुपये किमतीचा मुद्देमाल ( महिंद्रा थार वाहनासह मोबाईल व रोख रक्कम)

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजने  ,सहा पोलीस  फौजदार, महादेव कदम, पोलीस हवालदार धनाजी शेळके पोलीस नाईक अमोल वाघमोडे,राकेश लोहार, पोका / मनोज शिंदे, रंजीत मदने, दिनेश रणवरे, जावेद आतार, नातेपुते पोलीस ठाणे तसेच सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments