Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानासाठी ‘मार्केट डे’चे भव्य आयोजन


महादरबार न्यूज नेटवर्क -
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढविण्यासाठी सोमवार दिनांक १/१२/२०२५ रोजी ‘मार्केट डे’चे आकर्षक आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल २५० विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला.


कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या सेक्रेटरी डॉ. योगिता निटवे मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे पूनम देशमुख व सानिका शिंदे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील स्टॉल्स उभारून खाद्यपदार्थ, हस्तकला साहित्य, पर्यावरणपूरक वस्तू, पुस्तके,  शालोपयोगी वस्तू आदींची मांडणी केली. प्रत्येक स्टॉलची रचना अनोखी व आकर्षक असल्यामुळे उपस्थित पालक व पाहुण्यांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
      
उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील विक्री-खरेदीची पद्धत, ग्राहकांशी संवादकौशल्य, नफा-तोटा समज, व्यवस्थापन, जाहिरात–प्रचार, समुहकार्य आणि आर्थिक नियोजन यांचा अनुभव मिळवून देणे हा होता.
   
 शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ .दत्तात्रय निटवे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत पुढील काळात अशा अनेक व्यवहारिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.          
     
पालकांनीही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत शाळेच्या उपक्रमांचे अभिनंदन केले.

हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील सर, उपमुख्याध्यापक जिलानी आतार सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख दीपक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख रेशमा तांबोळी, व योगिता गाढवे यांनी, तर
आभार प्रदर्शन जिलानी आतार सर यांनी केले

Post a Comment

0 Comments