Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरडवाडी येथे शिक्षण परिषद संपन्न

महादरबार न्यूज नेटवर्क -

 गोरडवाडी येथे पंचायत समिती माळशिरस समूह साधन केंद्र इस्लामपूर केंद्रामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरडवाडी येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करून केंद्रस्तरीय शिक्षण परिषद (तळागाळातील किंवा शाळा स्तरावरील) शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजन केले असून मुख्य उद्देश: शिक्षकांचे अध्यापन कौशल्य सुधारणे, वर्गातील शैक्षणिक अडचणींवर चर्चा करण्यात आली आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी मदत होते . शिक्षण परिषदेसाठी केंद्रातून केंद्रप्रमुख बापूसाहेब हाके तसेेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम कर्णवर ,माजी सरपंच विजय गोरड,ग्रामविकास अधिकारी जोशना दिक्षित ,शिक्षक तज्ञ पत्रकार संजय हुलगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून  कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .


केंद्रस्तरीय शिक्षण परिषद (शालेय स्तरावर)शिक्षकांचा व्यावसायिक विकास घडवून आणण्यासाठी आणि वर्गातील अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी  शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, १००% शाळा प्रगत करणे आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान  अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे.प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे आणि अभ्यासक्रम निश्चितीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका साखरण्यास मदत होते.

▪️डॉ. जयंत नारळीकर गणित, विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम याचे मार्गदर्शन श्री धनाजी वाघमोडे यांनी केले.

 शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण या उपक्रमाचा १००% प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण संचालनालया मार्फत शिक्षकांसाठी टप्प्याटप्प्याने ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करून शिक्षकांना डिजिटल प्लॅटफॉर्म कसा वापरायचा याची माहिती देण्यात आली .या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्व-गतीने  गणित व विज्ञान शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण आणि नियोजन

• अचूक मूल्यमापन प्रशिक्षण: शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या बहुविद्याशाखीय अचूक मूल्यमापन करण्यासाठी मदत होते  . 

यावेळी उपस्थित मार्गदर्शक केंद्रप्रमुख बापूसाहेब हाके , बि आर सी पंचायत समिती महादेव शेंडगे ,मुख्याध्यापक रेवण भोसले,राजेंद्र गोरड,अश्विनी हंकारे ,नीलिमा जंजाळ ,वसुंधरा मडके ,तायाप्पा गोरड, सुनील काळे ,अप्पासाहेब गोरड , प्रमोद पोरे ,स्वाती विपट ,कल्याणराव काळे , राणी धायगुडे ,ज्ञानेश्वर येडवे सह नवनियुक्त शिक्षक यांचा सन्मान तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचा सन्मान करण्यात आला . शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन राजेंद्र गोरड यांनी केले तर आभार मंजुषा खताळ यानी मानले .

Post a Comment

0 Comments