Hot Posts

6/recent/ticker-posts

#Mumbai आशियाई सुवर्णविजेत्या महाराष्ट्राच्या शिलेदारांचा कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरव

आस्लम इनामदार व सोनाली शिंगाटे यांच्या ऐतिहासिक कामगिरीला आमदार निकम यांची मंत्रालयात सन्मानाची थाप; महाराष्ट्राच्या क्रीडावैभवात मानाचा तुरा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

 Aichi Nagoya, जपान येथे आयोजित 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघांनी पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक पटकावत देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय पुरुष कबड्डी संघातील प्रमुख रेडर आस्लम इनामदार तसेच भारतीय महिला कबड्डी संघातील सोनाली शिंगाटे यांचा मुंबई येथील मंत्रालयात कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी सन्मानपूर्वक गौरव केला.

यावेळी आस्लम इनामदार आणि सोनाली शिंगाटे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. देशासाठी मैदानावर झुंज देत मिळवलेले हे सुवर्णपदक म्हणजे त्यांच्या अथक मेहनतीचे, जिद्दीचे आणि क्रीडाप्रती असलेल्या समर्पणाचे फलित असल्याचे यावेळी गौरवाने नमूद करण्यात आले.

महाराष्ट्राच्या मातीतून घडलेले हे क्रीडाशिलेदार आज देशाच्या अभिमानाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या यशामुळे महाराष्ट्राची मान उंचावली असून, राज्यातील हजारो युवा खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

“खेळाच्या मैदानावर मिळवलेले यश हे केवळ पदक नसते, तर ते असंख्य स्वप्नांना नवी दिशा देणारी प्रेरणा असते,” या भावनेतून या दोन्ही सुवर्णपदक विजेत्यांच्या पुढील वाटचालीसाठी  कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राच्या शिरपेचात सुवर्णाचा मानाचा तुरा खोवणाऱ्या आस्लम इनामदार आणि सोनाली शिंगाटे यांना मनःपूर्वक सलाम.

Post a Comment

0 Comments