#Yavat:हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर, उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दि १७ रोजी लोणी काळभोर येथे
मराठी पत्रकार परिषद, मुंबई व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ संचलित हवेली तालुका पत्रकार संघाची नविन कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्याने हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम. देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सुचनेनुसार विभागीय सचिव अरुण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नव्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.

हवेली पत्रकार संघाची कार्यकारिणीची नियुक्ती बुधवारी हॉटेल एस.फोर.जी. थेऊर फटा, सोलापूर हायवे येथे पार पडली. यावेळी रमेश निकाळजे यांची अध्यक्षपदी, तर स्वप्नील कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर इतरही निवडी जाहीर करण्यात आल्या. कार्याध्यक्षपदी विकास काळभोर, कोषाध्यक्षपदी अक्षय दोमाले, पत्रकार हल्ला कृती समितीपदी दिगंबर जोगदंड यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनीत जैनजागडे, रुपालीताई काळभोर, मंगल बोरावके, मिलन दाभाडे, सुवर्णा हिरवे यांची निवड करण्यात आल्याचे पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी जाहीर केले.

या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार (तात्या), परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, जिल्हा सोशल मिडिया उपाध्यक्ष राहुल शिंदे, पुणे जिल्हा पत्रकार संघ महिला प्रतिनिधी श्रावणी कामत, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे संघटक राजू वारभुवन, अर्चना मेंगळे, दौंड पत्रकार संघाचे संतोष जगताप ,राहुल अवचट ,मनोज खंडागळे व हवेली पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लोणी काळभोरचे सरपंच योगेशनाना काळभोर, उपसरपंच सौ. ललिताताई राजेंद्र काळभोर, ऍड. सुजित कांबळे,, ऍड. श्रीकांत भिसे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजयमामा भालेराव, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखाचे पोलीस निरिक्षक सुभाष काळे, शिवसेना पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर, केतन निकाळजे, संदीप बडेकर, विशाल वेदपाठक, सिद्धार्थ काळभोर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नुतन अध्यक्ष रमेश निकाळजे यांनी केले, तर आभार हल्ला विरोधी कृती समितीचे दिगंबर जोगदंड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम