महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव ३० वर्षानंतर झालेल्या सुशोभिकरणाने रूपडं पालटलेल्या चिपळूण रेल्वेस्थानकाचे लोकार्पण रत्नागिरी येथील कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रवींद्र चव्हाण व पालकमंत्री श्री.उदय सामंत यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रक्षेपण येथील स्थानकात करण्यात आले.कोकण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार साडेपाच कोटी रूपये खर्चुन येथील रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.बुधवारी रत्नागिरीतून दूरदृष्य प्रणालीद्वारे या कामाचे लोकार्पण झाले. येथील स्थानकात यावेळी आमदार श्री.शेखर निकम,कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष श्री.शौकत मुकादम,प्रदेश सचिव जयंद्रथ खताते,जेष्ठ नेते दादासाहेब साळवी,बाबू साळवी,मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर,माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे,राष्ट्रवादी क्षेत्राध्यक्ष रमेश राणे,उदय ओतारी,पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम,मनसे अध्यक्ष अभिनव भुरण,माजी नगरसेविका रसिका देवळेकर,आदीती देशपांडे,कळंबस्ते सरपंच विकास गमरे,वालोपे सरपंच प्रतीक सुर्वे,युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम,बाबाराम गजमल,प्रवीण कदम,सलीम पालोजी,सिकंदर चिपळूणकर,संकल्प सुर्वे,पेढे ग्रामपंचायत सदस्य तुषार गमरे,महायुतीचे पदाधिकारी,बांधकाम विभाग रोह्याचे उपअभियंता जमील पटेल,शाखा अभियंता विशाल नलावडे,महेश वाजे यांच्या सह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments