Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न - पै अक्षय भांड


महादरबार न्यूज नेटवर्क - 
राष्ट्रीय नेते, मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबई शहरातील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा माळशिरस तालुक्यात निषेध
राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुक्याचे वतीने मुंबई याठिकाणी घडलेल्या घटने बद्दल  माळशिरस तहशिल कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अक्षय भांड यांनी निवदन दिले.
 
घडलेली घटना हि महाराष्ट्रा च्या राजकारणाला न शोभणारी आहे ज्या नेत्यांने या महाराष्ट्र साठी आपले आयुष्य झिजविले आहे,ज्या ज्या महाराष्ट्रा वर संकट आली त्या त्या वेळेस आदरणीय पवार साहेब हे सह्याद्री सारखे उभे राहिले हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. आणि त्यांच्या बाबत अशा घटना घडत असतील तर आम्ही गप्प बसणारी नाही अशा शब्दां मध्ये या घटनेचा निषेध भांड यांनी व्यक्त केला.

यावेळी अक्षय चौगुले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस शुभम सोरटे, रियाज शेख,रवीराज बोत्रे,उद्य बरडकर, युवराज वाघमोडे,निलराज शिंदे,तुषार साळवे,सत्यजित सुरवसे,अदित्य लाळगे,अनिल वाघमोडे,शैलेश वाघमोडे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments