#Chiplun:शरद पवारांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा राष्ट्रवादीकडुन तीव्र निषेध

                                             
हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा छडा लावुन कठोर  कारवाई  करावी...चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम यांच्या आदेशा आनुसार चिपळूण येथे तीव्र निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,भारत देशाचे माजी संरक्षणमंत्री आपल्या सर्वांची आदरणीय खा.मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब याच्या मुंबई येथील  सिल्व्हर ओक घरावरती शुक्रवार दि.८।०४।२०२२.राेजी भ्याड हल्ला करण्यात आला होता हा कट पूर्वनियोजित होता.राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत.मात्र तो यशस्वी झाला नाही. 

या देशात असा प्रकार याआधी कधीच घडलेला नाही, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि त्यादिवशी पासून अनेक प्रकारे हे सरकार पाडण्याचे काहींचे मनसुबे आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे.

 जो भ्याड हल्ला केला गेला त्याच्या मागे कोण आहे? याच्या त्या मागचा बोलविता धनी कोण आहे? याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही. एकदा छडा लागल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चिपळूणचे पाेलिस   उपविभागीय अधिकारी(DYSP)यांच्या नावे चिपळूणचे पोलिस स्टेशनचे पोलिस  निरीक्षक शिंदे  यांना निवेदन देण्यात आले.

चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या असंख्य प्रमुख नेते कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे कार्यकर्ती यांच्या वतीने शनिवार दि.९।०४।२०२२.रोजी सकाळी.११. वाजता चिपळूण शहर शिवाजी चौक चिंचनाका येती जमून या हल्ल्याचा मागे जो कुणी कटकारस्थान करत आहे.त्याच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला हा मोर्चा पुढे चालत जाऊन चिपळूण पोलिस स्टेशन येथे थांबून त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले.

या वेळी उपस्थित जयंत खताते,मिलींद कापडी,अशोकराव कदम,शिरीष भाऊ काटकर,सचय(अण्णा)रेडीज,सतीश  (अप्पा)खेडेकर,रमेश राणे,जयवंत शिंदे,संजय तांबडे,राकेश चाळके, योगेश शिर्के,नितीन ठसाळे,दशरथ दाभोळकर,मुराद अडरेकर,रियाज खेरटकर,मनोज जाधव,बिलाल पालकर,सिद्धेश लाड,खालिद दाभोळकर,सचिन पाटेकर,वात्सल्य शिंदे,राहुल शिंदे,बाबा कुटरेकर,इक्बाल मुल्ला,खालिद पटाईत,किसन चिपळूणकर,मंगेश वेस्पीकर,अमित कदम,समीर पवार, तुषार गंबरे,मंदार चिपळूणकर राज कदम,सूरज गुढेकर आदी उपस्थित होते.  

महिलांमध्ये राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष चित्राताई चव्हाण,पूजाताई निकम,दिशा दाभोळकर,जागृती शिंदे,दीपिका कोतवडेकर,सीमा चाळके,रिहाना बिजले,वर्षा जागुष्टे,शिवानी पवार,जानवी फाेडकर,सोनाल मिर्लेकर,पूनम भोजने,प्रणिता घाडगे आदी महिला उपस्थित होत्या. 

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत