#Phaltan:शेतपीके वाचवण्यासाठी फलटण तालुक्यातील मलवडी गावातील शेतक-यांची शिवसेना जनसंपर्क कार्यालयास भेट


महादरबार न्यूज नेटवर्क - गोविंद मोरे
फलटण तालुक्यातील मलवडी येथील बिचुकले वस्ती डिपी मागील सहा दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने मलवडी येथील शेतक-यांनी दि.९/४/२०२२ रोजी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी सुरु केलेल्या फलटण येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन शेतपीकांच्या होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात येणार असल्याचे सांगितले. 

त्यावर सातारा जिल्हा वीज महावितरणचे अधिक्षक गायकवाड, फलटण तालुका वीज महावितरणचे मुख्य अभियंता आवळेकर, सह मुख्य अभियंता जमाले व वाठार निंबाळकर वीज महावितरण विभागाचे अधिकारी कुंभार यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधून सदर समस्या दूर करण्यासाठी सांगितले असता काहींनी ऑईलचा सातारा जिल्ह्यात तुटवडा असुन ऑईल साठा शिल्लक नसल्याचे सांगितले. तर काहींनी ट्रान्सफाॅर्मर शिल्लक नसल्याचे सांगितले, तर काहींनी थोडेतरी वीजबील भरावे असे सांगितले. इत्यादी कारणांमुळे ट्रान्सफाॅर्मर देता येणार नाही असे वीज महावितरणच्या अधिकारी यांनी सांगितल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले. 

वीज महावितरणचे अधिकारी गायकवाड, आवळेकर व जमाले यांनी ऑईल अभावी ट्रान्सफार्मर देता येत नसल्याचे सांगितल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेकडे संपर्क साधुन वीज महावितरणला स्थानिक पातळीवर तातडीने ऑईल खरेदी करण्यासाठीचे आदेश देऊन शेतकरी व शेतपीकाचे रक्षण करावे अशी मागणी केली आहे. शेखर सिंह यांनी वीज महावितरणशी चर्चा करुन मार्ग काढु असे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच मलवडी येथील शेतक-यांच्या समस्येचे निवारण होईल. समस्येचे निवारण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम