#Satara:आकाश दडस यांना राज्यस्तरीय ' आदर्श पत्रकार ' पुरस्कार जाहीर


महादरबार न्यूज नेटवर्क  -
माण तालुक्यातील येळेवाडी गावचे सुपुत्र माण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार आकाश दडस यांना कोल्हापूर येथील संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण  २८ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता कोल्हापूर येथे विविध मंत्री अभिनेते व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

आकाश दडस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ जर्नालिझम मास कमुनिकेशन पदवीचे शिक्षण घेतले आहे तर पुण्यश्लोक आहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठातून मास्टर मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून माण तालुक्यातील विविध विषयावर स्वतंत्रपणे लेखन करत आहेत. त्यांनी माण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद सुद्धा भूषवले आहे. 

पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी विविध मागणीचे निवेदन देऊन सुद्धा शासन दरबारी मांडले आहेत. आकाश दडस यांनी  आतापर्यंत दुष्काळ, पाणी प्रश्न, मेंढपाळांची प्रश्न अशा विविध विषयांवर निर्भीडपणे लिखाण केले आहे.

आकाश दडस यांना  राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक शैक्षणिक राजकीय व माण मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम