#Tuljapur:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवाडी येथे जंतनाशक गोळी वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क  -
दि. २६ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवाडी येथे जंतनाशक गोळी वाटप करण्यात आली. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, उस्मानाबाद अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. 
         
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम ही दि. २५ एप्रिल ते २ मे २०२२ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवू नये म्हणून या जंतनाशक गोळ्या देण्यात येतात. त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास चांगले पूर्णतः होण्यासाठी या गोळ्या वाटत केल्या जातात.
        
यावेळी काक्रंबावाडी येथील शिक्षणप्रेमी महेश बजरंग कोळेकर यांच्या हस्ते या जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जेटीथोर सर, गुरव सर तसेच काक्रंबावाडी येथील ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम