#Solapur:डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी


महादरबार न्यूज नेटवर्क - 
सोलापूर येथील डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर येथे दि. ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा विभाग यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
        
यावेळी बोलताना महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. शिंदे सर म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी, समाजातील अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती वाईट परंपरा समूळ नष्ट करण्याचे कार्य केले. आज आपण त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर असायला हवा.
    
   
यावेळी दयानंद वाणिज्य महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. शिंदे सर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. अमोल बोबडे सर , पटेल सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका , कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम