#Yavat:पी.एम.पी.एम.एल ने ग्रामीण भागातील दैनंदिन व मासिक पास सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पी.एम.पी.एम.एल. ने ग्रामीण भागातील प्रवाशाच्या सोयीसाठी असणारी दैनंदिन आणि मासिक पास सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
काही महिन्यांपूर्वी पुणे शहर आणि उपनगरात कार्यवत असलेली पी.एम.पी.एम.एल बस सेवा पुणे शहराबाहेर दूर दूर पर्यंत सुरू करण्यात आलेली आहे. या बस सेवेचा मोठया प्रमाणात लाभ हा ग्रामीण भागातील प्रवाशांना होत असून यामुळे बसचे उत्पन्न ही वाढलेले आहे, कोरोना काळात रेल्वे आणि एस. टी. सेवा बंद केल्याने ग्रामीण प्रवाशांची कोंडी झालेली होती, कोरोना परिस्थिती शिथिल झाल्याने ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या बस सेवेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे.
ग्रामीण प्रवाशांना दैनंदिन ७० रुपये व मासिक १४०० रूपये मासिक पाससेवा देत असल्याने प्रवासी संख्याही वाढलेली होती, दौंड तालुक्यातून हडपसर कुरकुंभ, पुणे स्टेशन पारगाव, यवत सासवड आशा बससेवा आहेत, सर्व सुरळीत चालले असताना १ एप्रिल पासून दैनंदिन व मासिक पास सेवा अचानक बंद करण्यात आली आहे.
पुणे शहर व उपनगरात ही पास सेवा पूर्ववत सुरू आहे, मग ग्रामीण भागातून उत्पनाचे श्रोत्र चांगले असताना अचानक पास सेवा बंद करण्याचे कारण काय?, यामुळे ग्रामीण ग्रामीण व शहरी हा जाणीव पूर्वक दुजाभाव करण्यात येत आहे, हे योग्य नाही, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पास सेवा त्वरित सुरु करण्यात यावी नाही दर कमी झाले तर प्रवासी वर्गातून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे सूर उमटले जात आहेत.
Comments
Post a Comment