#Natepute:हर हर महादेवच्या गजरात दुमदुमला मुंगी घाट
भक्ती-शक्तीचे लाखो भाविकांना घडले दर्शन
महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्रातील ऐतिहासिक व प्रसिध्द भगवान शंकरांचे जागृत देवस्थान,म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झाली असून १३ एप्रिल रोजी अवघड अश्या मुंगी घाटातून महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कावडी चढण्याचा सोहळा बघण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांना भक्ती आणि शक्तीचे दर्शन घडले महाराष्ट्रातील आलेल्या कावडी मुंगी घाट चढल्यानंतर शेवटी मानाची असणारी पुरंदर तालुक्यातील संत तेल्या भुत्याच्या कावडीने सायंकाळी पाच वाजता मुंगी घाट सर करायला सुरुवात केली.
सर्व भाविकांनी ‘हर हर महादेवा’च्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगर दोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर करीत पायी वारीने आणलेल्या पवित्र जलाने शिवभक्त भाविक भक्तांच्या हस्ते स्वयंभू ‘श्रींना धार घातली संत तेल्या भुत्याची कावड मुक्कामांच्या ठिकाणी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पोहचली.
मानाची तेल्या भुत्याची कावड दुपारी तीनच्या दरम्यान ढोलताशा, वाजंत्री यांच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने कावड कोथळे गावात आली या ठिकाणी कोथळे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने तेल्या भुत्याच्या कावडीचे स्वागत केले. कावडीने सायंकाळी पाच वाजता तेल्या भुतेच्या कावडीने मुंगी घाटाच्या दिशेने प्रयाण केले. सायंकाळी पाचपर्यंत कावड मुंगी घाट पायथ्याला आल्यानंतर महाआरती करून शिव शंभोच्या हरिनाम हरिनाम महादेवांच्या नावाचा महागजर झाला व भक्तिमय वातावरण कावडीची अवघड अशी मुंगी घाटाची चढण सुरू झाली वाजंत्र्यांच्या, डफडीच्या ठेक्यावर बिगर दोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने होणारी कावडीची चढण हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. महाराष्ट्रभरातून आलेले लाखो भाविक डोंगरमाथ्यावर गर्दी करून बसले होते.
या वेळी घाटमाथ्यावर सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनातील गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते, मोरोची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहता, मांडवे प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि मनोज सोनवलकर, वीज वितरणचे डोईफोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती प्रताप पाटील, कोथळे गावचे सरपंच व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment