#Malshiras:माळशिरस पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन


महादरबार न्यूज नेटवर्क - 
इस्लाम धर्मात हिजरी नुसार वर्षात बारा महिने असतात त्यापैकी  ९ वा महिना म्हणजे रमजान महिना असतो  या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण महिने रोजे( निरंकार उपवास )करतात (रोजे)  उपवास करून उपवासी राहतात जेणे करुन    जे गोरगरिब  दीन दुबळे असतात त्यांना एक वेळचे जेवण ही प्राप्त होत नाही अशा गोरगरिबांच्या उपाशी  पोटाची  जाणीव  व्हावी  आणि त्यांना निरंतर  मदत करावी म्हणुन ईश्वराने इस्लाम  धर्माला  रोजे करणे  सक्तीचे केले आहे शिवाय या  रोजा च्या  च्या माध्यमातून ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मुस्लिम बांधव रोजे करत असतात आणि प्रत्येक जण या रोजेदारांना आपल्या परीने इफ्तार  पार्टी देत असतात.
या रोजाचे इतके महत्व आहे की ज्यांनी कोणी रोजेदाराला  रोजा सोडताना एक खजूर खाऊ घातला तर ईश्वर तो  खजुर खाऊ घालणाऱ्या ला सत्तर खजूर खाऊ घालण्याचे पुण्य प्राप्त करून देतो अशी आख्यायिका  आहे त्या अनुषंगाने दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्या वतीने माळशिरस येथील मुस्लिम बांधवांना करिता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .

याप्रसंगी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शेळके साहेब ,घोळकर साहेब ,बाळासाहेब सरगर ,सुरेश भाऊ टेळे, आकाश सावंत , पत्रकार एल डी वाघमोडे, संजय हुलगे, तानाजी वाघमोडे,अनंत  दोशी, आनंद शेंडगे ,स्वप्नील राऊत, करडे तसेच माळशिरस मधील बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब सरगर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मुस्लिम समाजाचे व पोलिस स्टेशन चे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत