#Natepute:फोंडशिरस येथे जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांचे कामाचे भूमिपूजन संपन्न
महादरबार न्यूज नेटवर्क -
फोंडशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांच्या शिफारसी नुसार फोंडशिरस येथील वार्ड क्रमांक 6 मध्ये ननवरे वस्ती ते रुपनवर वस्ती या रस्त्यासाठी 6 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन दिमाखात संपन्न झाले.
यावेळी ज्येष्ठ नेते भानुदास पाटील,माजी सरपंच विष्णू गोरे, सरपंच पोपट बोराटे ,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील,उपसरपंच दादा रणदिवे,संजय मामा कोडलकर,बशीर भाई मुलानी, माजी उपसरपंच उमाजी बोडरे, ग्रामपंचायत सदस्य भाऊ पाटील, परशुराम शेंडे,प्रदीप गोरे,बंडगर,काळे,ननवरे वस्ती रुपनवर वस्ती व पांढरे वस्ती वरील ग्रामस्थ व वार्ड क्रमांक 6 चे सदस्य सुनील गोरे कृष्णा ढोबळे व हनुमंत कुंभार यांनी सुरेश आबा पालवे यांचे आभार मानले.
सुरेश आबा पालवे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागासाठी विशेष असे प्रयत्न करून भरगोस असा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे सुरेश आबा पालवे पाटील यांचं कामच लय भारी असं लोकांमधून बोलले जात आहे.
Comments
Post a Comment