#Chiplun:कळकवणे दादर येथे आ.शेखर निकम यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे दादर येथे दि. २०/०५/२०२२ रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजन संपन्न झाले.
कळकवणे, वालोटी, ओवळी या तिन्ही गावांमध्ये असलेली नळपाणी पुरवठा योजना सन २०१९ मध्ये बंद पडली होती, तेव्हापासून सदरच्या तिन्ही गावातील ग्रामस्थाना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत होता. या तिन्ही गावांमध्ये संपूर्ण बारमाही पुरेल असा नैसर्गिक पाण्याचा मोठा स्रोत नसल्याने या तिन्ही गावांसाठी कोयना ई व्ही टी स्रोतातून ग्राव्हीटी द्वारे पाणी योजना राबविणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे असे मार्गदर्शन व सूचना माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते अशोकराव कदम यांनी केले. त्यानुसार ऍड. अमित कदम, सतीश सुर्वे, कळकवणे ग्रामपंचायत सरपंच कविता आंबेडे, मनोहर पिंगळे, संजय गणवे, दिनेश शिंदे, सुनील शिंदे, बाळ धुळप, कृष्णकांत आंबेडे, व सहकारी यांनी सादर योजना मार्गी लावणे कामी पाठपुराव्यास सुरुवात केली.
सदरची योजना कार्यरत होऊ शकते व कसे यासाठी सर्वेक्षणाची व त्यासाठी निधीची गरज होती, यावेळी आमदार शेखर निकम यांच्याकडे ग्रामस्थाना मागणी केली असता आमदार शेखर निकम यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला व त्यामुळे अत्यंत महत्वाचे सर्वेक्षण पार पडले असे जि. प. माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम यांनी सांगितले.
अशोकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शनाखाली ऍड अमित कदम, सतीश सुर्वे, व त्यांचे सहकारी सदरची योजना मार्गी लावणे कामी सतत पाठपुरावा करीत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चिप एक्जझुटीव्ह इंजिनिअर गजबिये, एक्जझुटीव्ह इंजिनिअर वानखेडे, एक्जझुटीव्ह इंजिनिअर जाधव, डेप्यु. पाटील मॅडम, यांनी देखील सदर योजना मंजूर होणे करिता अतोनात प्रयत्न केले व अखेर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांनी बारा कोटी एक्याशी लाखाचा निधी मंजूर करून आणला व सदरची योजना मंजूर झाली. असे ऍड अमित कदम यांनी सांगितले.
दि २० मे रोजी आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते तिन्ही ग्रामपंचायतना ग्रामपंचायत कळकवणे येथे सदरच्या योजनेचे मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले. आमदारांच्या प्रयत्नाने रिंगी धनगरवाडी नवीन रस्ता, अडरेकर वाडी रस्ता डांबरीकरण, ऐनादवाडी रस्ता, गुरवाडी रस्ता, दादर स्मशानभूमी रस्ता, दादर नळपाणी योजना दुरुस्ती, या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिखर समिती अध्यक्ष ऍड अमित कदम, सरपंच कविता आंबेडे, उपसरपंच सविता निकम दिनेश शिंदे, संजय गणवे, सुदेश शिंदे , सतीश सुर्वे, विलास सकपाळ, बाळा धुलप, अनंत कदम, मानसिंग कदम, महादेव झुजम, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, सुहासिनी गमरे, प्रवीण पवार, म. जि. प्रा. चे जाधव, व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमाचे सुयरसंचालन व माहिती जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम यांनी केले. व ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment