महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब . आरोग्य मंत्री श्री.तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील जनतेला डायरेक्ट वैद्यकीय मदत करणारे शिंदेगटाचे शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख श्री. राजकुमार हिवरकर साहेब हे माळशिरस तालुक्यातील गरीब गरजूंना आरोग्याच्या बाबतीत रात्रन दिवस मदत व्हावी यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे व सर्वसामान्यांचे आरोग्यदुत शिवसेना तालुकाप्रमुख श्री.राजकुमार हिवरकर साहेब हे आहेत. असे सामाजिक कार्यकर्ते केतन यादव हे आज नातेपुते येथील शिवसेनाभवन येथे तालुकाप्रमुख श्री.राजकुमार हिवरकर साहेब यांच्या भेटी दरम्यान पत्रकारांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रातील मदत कार्य पाहून मी साहेबांच्या भेटीला आलो आहे. व हा सत्कार त्यांच्या कार्याचा आहे. व ज्यांना आजपर्यंत दवाखान्यात साहेबांनी मदत केलेली आहे त्या गरीब व सर्वसामान्य जनतेच्या वतीने हा सन्मान आम्ही केला आहे. असेही ते म्हणाले.
0 Comments