#Chiplun:कोंडीवरे गावातील माजी पं.स. सदस्य जाकीर शेकासन यांच्या समवेत सरपंच सायली केंबळे, उपसरंपच, ग्रा.पं. सदस्य, प्रतिष्ठीत व्यक्ती आणि ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देऊ - आ.शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सरपंच, उपसरंपच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेश कर्त्यांचे निकम यांनी जोरदार स्वागत करुन कोंडीवरे गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असा शब्द दिला.

प्रवेशावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, मला तुमचा अभिमान आहे आपल्या गावातील अनेक नाराजीच्या बातम्या येत होत्या. आपणास अनेक आमिषे दाखवण्यात आली. मात्र, आपण ती न स्वीकारता केवळ आणि केवळ विकासाला प्राधान्य देत कोणत्याही दबावाला न झुकता मला साथ देत आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे यासाठी आपले कौतुक आहे.

तुम्हा सर्वांचा मानसन्मान ठेवला जाईल, असा विश्वास आ. शेखर निकम सर्व ग्रामस्थांना दिला. गावाच्या विकासासाठी तुम्ही आलात. त्या विकासासाठी आपण लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. आपल्या येथे राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्यात येते, हे सर्वांनाच माहीत आहे. यांची आपणास प्रचीती येईलच असे आ. निकम यांनी स्पष्ट केले.

या पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी पं.स. सदस्य आणि विद्यमान उपसरपंच कोंडीवरे जाकीर शेकासन यांच्या समवेत माजी सरपंच कोंडीवरे बशीर खतीप, सरपंच कोंडीवरे सायली केंबळे, ग्रा.पं. सदस्य फरीदा माद्रे, ग्रा.पं. सदस्य शबनम कापडी, दिलदार मुश्ताक खोत, गावकर रावजी भुवड, सैफ खतीब, नितीन केंबळे, शशी केंबळे, दिपक कातकर, दिपक भुवड, संतोष भुवड, फिरोज खान, अरमान हाजी,  लियाकत कापडी, तैमूर शेखासन, सिंकदर सय्यद, एजाज कापडी, सुलेमान खान, रुपाली निकम, शफी माद्रे, साकीब खतीब, महमद खान, मुश्ताक खोत, आरवलीचे सौरभ पिलणकर, शुभम पिलणकर यांनी प्रवेश केला.

कोंडीवरे गावचे प्रवेशकर्त्यांनी आम्हाला कोणत्याही गट-तटाचे राजकारण नको. आम्ही प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमची या पुढे तुम्हाला खंबीरपणे कायमची साथ राहील, असा शब्द सर्वानी दिला.

यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र सुर्वे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुशिल भायजे, माजी पंचायत समिती सदस्य नाना कांगणे, माखजन सरपंच मयुर बाष्टे, तुकाराम येडगे, गणपत चव्हाण, गजानन सुर्वे, शेखर उकार्डे, शशिकांत घाणेकर, दिपक जाधव, डॉ. राकेश चाळके, शबी शाह, सुलतान कापडी, कमर सावंत, फिरोज खान, सिकंदर सय्यद, अमित माचिवले इ. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत