#Malshiras:तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियाना अंतर्गत पंचायत समिती माळशिरस येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील केंद्र शाळेत प्रथम क्रमांक आलेल्या माता पालकांचा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती .

या पाककृती स्पर्धेमध्ये ज्योती अंकुश फाटे (कोळेगाव )यांचा प्रथम क्रमांक आला आहे .तर अर्चना नानासाहेब निकम (खंडाळी बोरगाव )यांचा द्वितीय क्रमांक आला आहे. तर शोभा तानाजी वाघमोडे( पाटील वस्ती साठ फाटा) यांचा तृतीय क्रमांक आला आहे. या स्पर्धेचे परीक्षण आय .सी. डी. एस . विभागाच्या एस .जी. कुलकर्णी ,आर. पी. चव्हाण, एम. एस. सोनार, एम .बी .वाळकोळी, एस. के. नदाफ ,एस.ई.राऊत यांनी केले. सदर स्पर्धा अधिक्षक शालेय पोषणचे मयूर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या स्पर्धेसाठी बी .आर. सी. विषय तज्ञ चंदनशिवे सर, घुले सर, केंद्रप्रमुख प्रकाश कांबळे ,केंद्रप्रमुख धनाजी वाघमोडे ,केंद्रप्रमुख दगडू पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील माता पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर स्पर्धेचे प्रास्ताविक बीआरसी विषय तज्ञ चंदनशिवे सर यांनी केले तर घुले सर यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम