Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून आंबव पोंक्षे गावातील विकास कामांचे भुमीपुजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील मौजे आंबव पोंक्षे गावात आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विकास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या गावातील रस्त्यांच्या खडीकरण डांबरीकरणाचे भुमीपुजन ग्रामस्थ, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

गेली अनेक वर्षांपासून आंबव पोंक्षे गावातील रस्त्यांची अवस्था दळणवळणासाठी अत्यंत बिकट झाली होती. रस्त्यांची कामे होणेसाठी गावातील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचेकडे निवेदन देवून रस्त्यांची कामे होणेबाबत आग्रही मागणी केली. गावातील रस्त्यांची झालेली दूरावस्था पाहता आमदार निकमा यांनी आपल्या विकास फंडातून या कामांसाठी निधी उपलबद्ध करून दिला. यामध्ये आंबव पोंक्षे मुख्य रस्ता ते कदमवाडी रस्ता डांबरीकरण करणे (6 लाख), आंबव पोंक्षे मुख्य रस्ता ते सुतारवाडी कोष्टेवाडी न्हावीवाडी बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (8 लाख), आंबव पोंक्षे मुख्य रस्ता ते बौद्धवाडी कोष्टेवाडी सुतारवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (6 लाख)इजिमा 61 ते आंबव भुवडवाडी पकडेवाडी सुतारवाडी जोड रस्ता ग्रामा 158 खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), आंबव पोंक्षे जूनी मराठी शाळा ते जूवळेवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (8 लाख), आंबव पोंक्षे जूवळेवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे(8 लाख) ही कामे मंजूर केली. त्यांचे भुमीपुजन ग्रामस्थांच्या बहुसंख्य उपस्थितीत पार पडले. आंबव पोंक्षे गावामध्ये विकास कामांसाठी आमदार निकम यांनी याआधी लाखो रुपयांचा विकास निधी दिला आहे, त्याबद्दल ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.

यावेळी सरपंच शेखर उकार्डे, उपसरपंच मंगेश मांडवकर, ग्रा. प. सदस्य सुनिल घडशी, निधी भायजे, गावप्रमुख मोहन भुवड, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्याध्यक्ष सुशील भायजे, धामापूर तर्फे संगमेश्वर जि. प. गटाचे विभाग अध्यक्ष महेश बाष्टे, तालुका सचिव सुबोध चव्हाण, संजय कदम, राजेंद्र जाधव, तानाजी धुलप, दिपक जाधव, विश्वास सुवरे, दिपक शिगवण, प्रथमेश निकम, प्रविण भुवड, दाजी भुवड, दत्ताराम शिगवण, विश्राम भुवड, संजय सुतार, चेतन साळवी, तुकाराम कदम, शांताराम जुवळे, गणपत बोले, राजाराम जुवळे, अशोक बोले, सचिन मायनाक, सुरेश जुवळे, प्रकाश धुलप, देवजी भायजे, दत्ताराम सुतार, अशोक कदम, दत्ताराम जाबरे, श्रद्धा गुरसळे, अनंत पकडे, नंदकुमार मायनाक, राजाराम मायनाक, किरण भायजे, विजय पकडे, संजय पकडे ,संतोष कदम, संतोष मांडवकर, शांताराम जुवळे, देवजी भायजे, सुरेश भुवड, गोविंद पकडे, संदिप घडशी, सुरेश मांडवकर, तुकाराम घडशी, केदार गोटेकर, दत्ताराम घडशी, संजय पांचाळ, सुप्रिया सुतार, महादेव जाधव, मोहन भुवड, मनोज गुरसळे, नंदू नेटके, संतोष सुतार, योगेश सुतार, शरद जाधव, प्रकाश कदम, संतोष विभुते, विजय पकडे, चंद्रकांत सुतार, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments