Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute पैलवान विकास दादा करे यांचा चंद्रकांत घुगरदरे प्रशाला येथे सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -

नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्था नातेपुते संचालित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नातेपुते चा माजी विद्यार्थी विकास दादा करे यांनी तुर्की येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाला कांस्य पदक मिळवून दिले.


त्याच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा कवितके, सचिव दिलीप घुगरदरे ,सभापती हनुमंत धालपे, विश्वस्त अभिजीत घुगरदरे, डॉ. नरेंद्र कवितके, नंदकिशोर धालपे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.


संस्था व शाळेच्या वतीने या खेळाडूचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्याचे वडील दादा करे यांचा ही सन्मान करण्यात आला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने यश संपादन करणाऱ्या या शाळेच्या माजी विद्यार्थ्याचे यश कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात कुस्तीचे धडे गिरवून देशाचा या परिसराचा नाव लौकिक वाढविला. क्रीडा क्षेत्रात अनेक उत्तम संधी आहेत.


त्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मनोगत नंदकिशोर धालपे सहशिक्षक पांडुरंग कुचेकर मुख्याध्यापिका स्मिता आवळे मॅडम यांनी व्यक्त केले.

समारंभाचे सूत्रसंचालन सुखदेव वलेकर यांनी केले. या प्रसंगी सहशिक्षक प्रशांत कथले क्रीडा शिक्षक शिवाजी पांढरे नाईक सुभाष गोरे यांना पुरस्कार मिळाले बद्दल संस्था व शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments