महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जि प प्राथमिक शाळा करांडेवस्ती येथील शाळेच्या शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी प्रमोद भैस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सतीश करांडे यांची.तर सदस्यपदी बालाजी करांडे,किरण जामदार, शिक्षणतज्ञ म्हणून गणेश जामदार, स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी म्हणून संतोष बगाडे,तसेच महीला पालक प्रतिनिधी म्हणून वर्षा भैस,पायल भैस,मिनाक्षी मदने,प्राजक्ता भैस यांच्या तर सचीव म्हणून चौरे सर,यांची निवड करण्यात आली या निवडीवेळी पालक राहुल चोबे, सागर भैस,तानाजी सुळे,हनुमंत भिसन,प्रकाश पाटील, शरद मदने, बाळु मदने,दत्तु करांडे,किरण जामदार, सचिन सुळे तसेच इतर पालक ,शिक्षक शेटे सर यावेळी उपस्थिती होते. निवडीनंतर सर्व नुतन पदाधिकाऱ्यांनचा सत्कार करण्यात आला.
0 Comments