Natepute:नातेपुते येथील बेघर लोकांना चादर वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते ता- माळशिरस येथे भारतीय मातंग युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व जैन विचार मंच निमंत्रक जेष्ठ साहित्यीक श्री. विठ्ठल साठे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथील बस स्टॉपवरती झोपणारे व बेघर लोकांना वाढदिवसानिमित्त मोफत चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळेस भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव म्हणाले की, विठ्ठल साठे साहेब यांच्या वाढदिवसाला आम्ही हार फेटे याला खर्च न करता. माळशिरस तालुक्यातील प्रत्येक बस स्टॉप व इतरत्र उघड्यावर झोपणाऱ्या बेघर लोकांना चादर वाटप करून आम्ही साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत.

यावेळी भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री. केतन यादव व अमित लांडगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळेस ओम पवार,अदित्य पाटोळे,सोहम कांबळे, कृष्णा नायकनवरे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम