#Chiplun:धामापुर तर्फे संगमेश्वर येथे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपुजन संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर गावातील आमदार शेखर निकम यांच्या विकास निधीतील जिल्हा वार्षिक योजना, 2515 योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, बजेट या योजनांतून मंजूर केलेल्या माखजन आंबेट मावलंगे रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे-60लाख, माखजन बौद्ध विहार शेजारी संरक्षण भिंत बांधणे, धामापूर तर्फे संगमेश्वर गोवळवाडी भायजेवाडी रस्ता डांबरीकरण करणे-50लाख, भडवलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे -15लाख , रामनवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे -7 लाख,तांबडवाडी रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख, ढोपरखोल वाडी रस्ता डांबरीकरण करणे -20लाख, धनावडेवाडी रस्ता डांबरीकरण करणे - 8लाख, धनावडेवाडी  शाळा नं.6 नवीन वर्ग खोली बांधणे -10 लाख या कामांचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. धामापूर तर्फे संगमेश्वर गावचे सरपंच शांताराम भायजे व ग्रामस्थांच्या बहुसंख्य उपस्थितीत हा भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. आमदार शेखर निकम यांनी गेली अनेक वर्षांपासून गावातील रस्त्यांची रखडलेली रस्त्यांची कामे होण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार निकमांकडे मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत ग्रामस्थांची होणारी अडचण पाहता आपल्या विकास फंडातून सदर कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले व सदैव त्यांच्या सोबत राहून आगामी काळात होणा-या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य आमदार शेखर निकम यांना देवून विजयी करणार असे सांगितले.


यावेळी चिपळूण मतदार संघातून जयंत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सचिन साडविलकर तसेच संगमेश्वर तालुक्यातील सुशील भायजे, महेश बाष्टे, शशिकांत घाणेकर, सरपंच-शेखर उकार्डे, गणपत चव्हाण, झाकीर शेखासन, दिपकजी जाधव, सिद्धार्थ पवार, अक्षय चव्हाण, अशोक मांडरकर, किशोर धनावडे, रघु भायजे सुभाष धनावडे- वाडीप्रमुख, शांताराम धनावडे शर्मिला मींडे, पांडुरंग येलोंडे, मावळगे सरपंच प्रकाश विर, कलंबुशी सरपंच सचिन चव्हाण, बावा जड्यार, रमाशेठ घाणेकर, अजित कांबळे गुरुजी, लहू सुर्वे ,तुकाराम मेस्त्री,गंगाराम भायजे, दिपक शिगवण,सुरेश रामाने,दत्ताराम भायजे, काशिराम शिगवण ,राजाराम भायजे, शंकर बोले ,पांड्या पद्ये, यशवंत पड्ये, देवस्थली सर ,पांडुरंग मिंडे गावकर ,हेमंत बाष्टे, भास्कर मांडरकर ,प्रवीण गोमने ,सीताराम भायजे -रामनवाडी वाडीप्रमुख,शैलेश चव्हाण, सुभाष कुळ्ये,संतोष भायजे,बबू कवलकर ,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम