#Natepute:भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पैशाची व पाण्याची बचत करा - रणजितसिंह मोहिते पाटील
महादरबार न्यूज नेटवर्क -
भविष्यातील दूष्काळाची चाहूल लक्षात घेऊन व्यापारी, व्यावसायिक व शेतकरी यांनी काटकसर करून पैशाची व पाण्याची बचत करावी असे मत आमदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी नातेपुते येथील मामाश्री ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या उद्घाटना प्रसंगी व्यक्त केले पतसंस्थेचे उद्दघाटन माजी उपमूख्यमंञी विजयसिंह मोहीते पाटील याच्या हस्ते करण्यात आले रणजीत सिंह मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले हवामान खात्याने पूढील वर्षीही पाऊसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे,त्यामूळे पूढील वर्षीचे नियोजन आजच करा
दूष्काळी परीस्थिती लक्षात घेऊन जून महिन्यापर्यंत चारा डेपो,चारा छावणी,पाण्याच्या टॅंकरची मागणीनूसार तरदूत करण्यात आली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
दूष्काळी परीस्थिती लक्षात घेऊन जून महिन्यापर्यंत चारा डेपो,चारा छावणी,पाण्याच्या टॅंकरची मागणीनूसार तरदूत करण्यात आली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अॅड शिवाजीराव पिसाळ यांनी सस्थेचा थोडक्यात आढावा घेऊन भविष्यातील योजनाची माहीती सांगितली.संचालक मोहीत जाधव यांनी आलेल्या पाहूण्याचे स्वागत केले यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर,आ.राम सातपुते, माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मामाश्री पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील, आ.रणजितसिंह मोहीते पाटील, आ.राम सातपुते, धैर्यशील मोहीते पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर , माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख, अर्जूनसिंह मोहीते पाटील, रघूनाथ कवितके, नगराध्यक्षा अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख, मामाश्री पतसस्थेचे चेअरमन तथा मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, व्हा चेअरमन रणजित काळे, शिवप्रसादचे दूध संघाचे चेअरमन शरद मोरे, डाॅ. एम,पी.मोरे, अॅड.डी.एन.काळे, आप्पासाहेब भांड, माऊली पाटील, महेश शेटे, वैभव दोशी, रणविर देशमूख, शिवाजीराव सूळ, माधव खांडेकर, संचालक अॅड.रावसाहेब पांढरे, नितीन गांधी, बिपीन इंगोले, धनाजी राऊत, जब्बार मूलाणी, तेजेस पाटील, सौ.कविता पांढरे, सौ.स्वाती बावकर आदि मान्यवर तसेच नगरसेवक, संचालक, ठेवीदार,सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment