#Natepute माढा लोकसभेचे भावी खासदार लक्ष्मण हाके यांचे गाव भेट दौरे सुरू


महादरबार न्यूज नेटवर्क -
माढा लोकसभेचे भावी खासादार अभ्यासू व्यक्तिमत्त्व, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रवक्ते मा.प्रा.श्री लक्ष्मणजी हाके साहेब यांची फोंडशिरस जि.प.गट आणि नातेपुते शहरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी फोंडशिरस जि.प.गटातील कुरबावी, एकशिव गावातील अनेक जेष्ट मान्यवराचे आशिर्वाद घेऊन लोकसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

तसेच पुढील कार्यक्रमाला जाताना नातेपुते शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची धावती भेट घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.

यावेळी राष्ट्रीय काॅंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व ओबीसीचे जिल्हाध्यक्ष मा. राजाभाऊ पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख मा. विजय रुपनवर, धर्मपूरी गावचे शिवसेना शाखाप्रमुख मा. मनोज राऊत,निवेदक नवनाथ रूपनवर सर तसेच  कुरबावी, एकशिव,डोंबाळवाडी येथील असंख्य नागरीक उपस्थित होते.

नातेपुते येथील भेटीदरम्यान शिवसेना शहरप्रमुख सनी गवळी, शमीर मुलाणी,निजाम काझी,आमिर बागवान राहुल देसाई, बंटी सूरती,साजिद मुलानी, सलीम मुलानी यांचेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम