#Natepute पालक,शिक्षक,संस्थाचालक या ञिसूञीमूळे एस.एन. डी.स्कूल गगनभरारी घेईल - आ.राम सातपुते
महादरबार न्यूज नेटवर्क -
देशाचे भविष्य मूलांच्या हाती असून भविष्यात चांगले,नागरीक देशभक्त घडविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होईल, . त्यामुळे मुलांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी त्यांच्यात देशभक्ती रुजवण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम करावेत, असे आवाहन आमदार राम सातपुते यांनी येथे केले.
येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बाबाराजे देशमुख होते. मंचावर संस्थेचे चेअरमन व नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, सुचित्रादेवी देशमुख, श्रुतिका देशमुख, अमरशील देशमुख, तात्यासाहेब देशमुख, माजी सरपंच भानुदास राऊत, पांडुरंग देशमुख, बाहुबली चंकेश्वरा, शिवाजीराव पिसाळ, अर्जुनराव जठार, महेश शेटे, सर्व विश्वस्त, माजी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, नगराध्यक्षा अनिता लांडगे आदी उपस्थित होते.
स्नेहसमेलन कार्यक्रमात लहान मुला-मुलींनी एकापेक्षा एक बहारदार गीते व नृत्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली.
यावेळी माजी जि.प,उपाध्यक्ष बादाराजे देशमुख म्हणाले, कोरोना काळात संस्थेची स्थापना केली. शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम शिक्षण दिले. पालकांनी विश्वास दाखवला. शाळा नावारूपाला येण्यासाठी संस्था,शिक्षक,पालक,विद्यार्थी यांचे मोठे योगदान आहे
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, आदर्श पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य संदीप पानसरे, स्कूल मॅनेजर शकूर पटेल व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.सूञसंचालन संंदिप जाधव यांनी केले तर,आभार विश्वजीत पिसाळ यांनी मानले.
Comments
Post a Comment