#Chiplun:प्रादेशिक विकास योजना अंतर्गत विकास कामांवरिल स्थगिती उठविण्याबाबत आ. शेखर निकम यांनी घेतली पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांची भेट

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
चिपळूण व संगमेश्वर तालुक्यात विविध ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे व संगमेश्वर तालुक्यात उंच डोंगरावर असलेले श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थान तेथे बारमाही वाहणारे नैसर्गिक धबधबे, विस्तीर्ण सह्याद्रि पर्वतरांगा, कसबा येथील छ. संभाजी महाराजांचे स्मारक, गडकिल्ले, लहान-मोठी ऐतिहासिक मंदिरे, गरम पाण्याची कुंडे, त्याचबरोबर चिपळूण येथील शिवकालीन तळी, पांडवकालीन गुहा. तसेच कोकणपट्टीला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा, या ठिकाणी पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. पर्यटनाच्या विकासासंदर्भात निधी उपल्ब्ध व्हावा म्हणून आमदार शेखर निकम यांनी शासणाकडून संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थान, , जयभवानी वाघजाई मंदिर टेरव, संगमेश्वर तालुक्यातील महिपतगड, चिपळूण तालुक्यातील बाजीबुवा काळेश्वरी मंदिर यांसारख्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासाठी निधी उपलब्ध झाला होता.

या मंजूर झालेल्या कामांना सद्य: स्थितीत स्थगिती देण्यात आल्यामुळे चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांचा विकास खोळंबला आहे. हा विकास होण्याच्या दृष्टीने या कामांवरिल स्थगिती उठविणे आवश्यक असल्याने आमदार शेखर निकम यांनी  पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांची भेट घेवून या कामांवरिल स्थगिती उठविणे संदर्भात सकारात्मक चर्चा केली व पुढील पंधरा दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल असे पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी आश्वासित केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत