#Chiplun महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत- आ. नितेश राणे
सावर्डे येथे आ. शेखर निकम यांच्या कार्यालय सदिच्छा भेटी प्रसंगी केले कार्यकर्त्यांना आवाहन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
आपण आपापल्या भागातील मातब्बर कार्यकर्ते असून महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांना भरघोस मतदान मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी चिपळूण दौऱ्यादरम्यान सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या कार्यालयास सदिच्छा भेटी प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तत्पूर्वी चिपळूण महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सुरुवातीला आमदार शेखर निकम यांच्यासह माजी सभापती विजय गुजर, माजी उपसावती सूर्यकांत खेतले आदींनी आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे ना. नारायणराव राणे यांना उमेदवारी मिळाली आहे. आपण आपल्या भागातील मातब्बर कार्यकर्ते असून महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांना भरघोस मतदान कसे मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता भाजप कार्यकर्त्यांसारखाच आपल्याला जवळचा असेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
तर आमदार शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment