Hot Posts

6/recent/ticker-posts

#Mumbai:शिवसेना शिंदे गटाचे नेते ॲड.सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर

मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट
महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेना शिंदे गटाचे नेते ॲड. सचिन जोरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांची भेट घेणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती समोर येतेय. 
याचबरोबर ॲड. सचिन जोरे हे २०१९ ला माढा लोकसभा निवडणुक ताकदीने लढविले होते. त्यामुळे त्यांचा सध्या मतदारसंघातील वाढता प्रतिसाद मिळत आहे.

त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ ला विधानसभा निवडणूक लढवली होती व तिसऱ्या क्रमांकावर मते मिळविले होती.  त्यानंतर वंचितच्या प्रदेश कमिटीवर कार्य करीत असताना महाराष्ट्रभर दौरा, मेळावे करून राज्यभर त्यांचा दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. एक उच्चशिक्षित म्हणून कार्यरत राहिलेले माढा लोकसभा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.  

माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार बांधव तुलनेने जास्त आहेत व सद्यस्थितीमध्ये एक धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून ओबीसी वर्गातून त्यांना वाढता पाठिंबा दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments