#Baramati बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीच्या कल्याणी वाघमोडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरला अर्ज

लोकांच्या मतांचा अनादर करणाऱ्या प्रस्थापित घराणेशाहीला मोडीत काढण्यासाठी सुप्त लाट...


महादरबार न्यूज नेटवर्क -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्र सह देशाचे लक्ष लागून राहिले आहे .बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात जरी असे चित्र असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदारांचा कौल मात्र वेगळाच असल्याचे दिसून येत आहे. एक सुप्त लाट दिसून येत आहे.

बारामती मतदारसंघातील लोकांना आता बदल हवा आहे. घराणेशाहीला बाजूला सारण्यासाठी आता तिसरा चेहरा समोर आहे. उच्चशिक्षित सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या  मूळ बारामतीच्या कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा समतोल विकास साधण्यासाठी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक युवती यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचे कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बारामती लोकसभा मतदारसंघांमधून चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व कल्याणी वाघमोडे या निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणी वाघमोडे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती, इंदापूर, दौंड ,भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, खडकवासला  आदी भागात संवाद दौरे सुरू आहेत.

या संवाद दौऱ्याला ठिकठिकाणी कल्याणी वाघमोडे यांना प्रचंड जनाधार मिळत असल्याचे दिसून येत आहे ,कल्याणी वाघमोडे यांनी क्रांती शौर्य सेनेच्या माध्यमातून राज्यभर संघटन उभारले आहे. या संघटनेच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर,  या सर्व बहुजन महापुरुषांचे विचार समाजात रुजवण्याचे काम संघटनेच्या मार्फत केले जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन असणाऱ्या बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावच्या इंजिनीयर, पदवीप्राप्त अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या व क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सक्रिय  आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात सतत कार्यरत असणाऱ्या, लोकांच्या जनसंपर्कात असणाऱ्या लेखिका व परखड महिला नेतृत्व, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वंचित घटक, कष्टकरी लोकांसाठी आयुष्य समर्पित करून गेली 20 वर्ष संघटनेच्या व चळवळीच्या माध्यमातून सामाजिक न्याय हक्कासाठी वाचा फोडणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचा संघर्ष मोठा आहे.

राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत आहेत. पुढील पिढीला हे विचार जपता यावेत म्हणून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या परखड शैलीतून, भाषणातून आपले मत मांडत असतात.      लहानपण व शालेय जीवन हे वडील नोकरीस असल्याने भवानीनगर येथील छत्रपती मुलींचे हायस्कूल याठिकाणी झाले. त्यानंतर बारामती, पुणे, मुंबई, दिल्ली याठिकाणी त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्या विमानाच्या इंजिनियर असून एक उद्योजिका म्हणून काम करतात.
शालेय जीवनापासून नेहमी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धां यामधून आपले विचार मांडत असतात. अनेक जयंती,  सोहळयामधून परखड महिला वक्त्या म्हणून पुढे आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर, पुणे, बारामती, पंढरपूर, मुंबई अश्या अनेक ठिकाणी आंदोलने आयोजित करुन समाजाच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या एक परखड महिला नेतृत्व आहेत. धनगर मेंढपाळ प्रश्न, ओबीसी जातनिहाय जनगणना, ओबीसी शिष्यवृत्ती, धनगर आरक्षण, महिला सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांसाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. नुकतेच मुंबई व दिल्ली याठिकाणी धनगर समाजाला आश्वासने देणाऱ्या व मतांसाठी वापर करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा जाहीर असा निषेध करत आंदोलने गाजवली.
महिला विषयावर जागृती, सुरक्षा, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, व्यसनमुक्ती, महागाई तसेच मेंढपाळ यांचे आरोग्य, रस्ते, शिक्षण यासाठी व आरक्षण आंदोलनातून शासन स्तरावर पाठपुरावा करत असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे संवाद दौरे, बैठका सतत चालू असतात. आजचे धगधगते प्रश्न जसे शेतकऱ्यांचे प्रश्न (हमीभाव, पाणीप्रश्न, चाराप्रश्न , बी बियाणे, आत्महत्या), महिलांचे प्रश्न, युवकांचे बेरोजगारी, अमली पदार्थ सेवन, कामगारप्रश्न, शैक्षणिकप्रश्न आदींवर गाव भेट दौरे चालू आहेत.अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये अहिल्यारत्न, समाजरत्न, महिलारत्न, सुपरवुमन तसेच आदर्श पत्रकारिता अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

स्व स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या कोणत्याच राजकिय पक्ष्यांवर सामान्य जनतेचा विश्वास राहिला नाही.९०% समाजकार्य व १० टक्के राजकारण करीत तळागाळातील ओबीसी वंचित बहुजन, दुर्बल घटकाला न्याय मिळवून देत विकासाच्या प्रवाहात आणणे हेच त्यांच्या जीवनातील अंतिम ध्येय आहे अशी माहिती वाघमोडे यांनी यावेळी दिली.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत