#Chiplun जंगम समाजासाठी कायमस्वरूपी सहकार्य करू - आमदार शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
माहेश्वरी मंडळ रत्नागिरी यांनी जिल्हा यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडॆ समाजाच्या सभागृहची मागणी ग्रामस्थाकडून केली होती. समाजातील पदाधिकारी मागणी नुसार आमदार शेखर निकम यांनी निधी उपलब्ध करुन दिला त्याचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी श्री निकम यांचे समाज भवनासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाजबांधवानी समाधन व्यक्त केले.
आमदार शेखर निकम यांनी शुभेच्या देताना समाज छोटा असून सुद्धा तुमची एकी महत्वाची आहे जंगम समाजाचे श्रद्धा स्थान जसे शंकर आहे त्याच प्रमाणे सह्याद्री संस्थेत शंकराचे मंदिर आहे, जागा मालकांना धन्यवाद दिले व आज चालू केलेले जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चिपळूण तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, युवक अध्यक्ष निलेश कदम, दादू गूढेकर, अध्यक्ष संजय जंगम, विवेकजी जंगम, सचिन जंगम, शैलेश जंगम, मोहन जंगम, मनोहर जंगम, अमोल जंगम, माधवी जंगम, शशिकांत जंगम, अमोल जंगम, कृष्णा जंगम, राजश्री जंगम, समीर जंगम, सरपंच बावा सुर्वे, महादेव स्वामी, सुनील गमरे, जयवंत अदावडे, सुरेश बहुतुले, बाबू माळी, प्रमोद शिंदे, अनिल शिंदे, युवा नेते प्रशांत जंगम, बाबा शिंदे, पांडू पिलावरे, दिनेश दळवी,
व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment