#Malshiras पिलीव येथील भैस - सुळेवस्ती ओढयावरील आ रामभाऊ सातपुते यांच्या फंडातुन मंजूर झालेल्या पुलाचे भुमीपुजन
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील भैस - सुळेवस्ती ओढयावरती माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या फंडातुन मंजूर झालेल्या पुलाचे आज पिलीव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा पाटील, पिलीवचे माजी लोकनियुक्त सरपंच नितीन मोहीते, माजी उपसरपंच संजय आर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर, माजी उपसरपंच नारायण सुळे,पिलीव विकास सोसायटीचे संचालक कुबेर भैस,मधुकर भैस,पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल नष्टे, समशेरसिंग रजपुत, पत्रकार दामोदर लोखंडे, संजय पाटील, सुजित सातपुते, उदय कदम ,नागरीक किसन भिसन,अनिल सुळे,नारायण भिसन,अर्जुन सुळे,सदाशिव भैस,वैभव सुळे,किरण भिसन,महादेव भैस ,विकास सुळे,हणमंत भिसन,रामचंद्र मंजार,अक्षय भिसन,तानाजी सुळे,सागर भैस,दिगांबर भैस,दामोदर भिसन,धनाजी सुळे,सुनिल भिसन,सारंग बनसोडे ,श्रवण भैस,ठेकेदार खेडेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडुन या पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याठिकाणी भैस - सुळेवस्ती येथील नागरिकांना ओढयावरती पुल नसल्यामुळे पावसाळ्यात ये - जा करणयासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत होता.याची कैफीयत पिलीव पत्रकार संघाच्यावतीने व ग्रामपंचायतीच्या वतीनेही वारंवार आ रामभाऊ सातपुते यांच्या कडे मांडली जात होती.आमदारांनी येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन या पुलासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजुर केला. यामुळे येथील नागरिकांची अनेक वर्षापासूनची गैरसोय दुर झाली. याबद्दल पत्रकार प्रमोद भैस यांनी आमदार रामभाऊ सातपुते यांनी आमची अनेक वर्षापासूनची अडचण निधी देऊन गैरसोय दुर केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्यवतीने आमदार रामभाऊ सातपुते यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment