महादरबार न्यूज नेटवर्क -
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त कारुंडे (तालुका माळशिरस) येथे भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सामाजिक उपक्रम राबवत भव्य रक्तदान शिबिर ११/०८/२०२४ रोजी पार पडले.
यावेळी वेळी रील्स स्टार निलेश पाराध्ये हे प्रमुख उपस्थित होते.तसेच माजी सरपंच अमर जगताप ,सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी रूपनवर, ग्रामपंचायत सदस्य गणेश गायकवाड, जितेंद्र गायकवाड,AS ग्रुप चे होनर अक्षय भाऊ शिंदे, वैभव गेजगे,सुभाष पाटील,सचिन गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य भारत नामदास,दशरथ देवकर, जयंती समिती अध्यक्ष दीपक खिलारे,लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते राहुल मिसाळ व भगवान (भाऊ)खिलारे,हनुमंत खिलारे,माऊली खिलारे,साहिल खिलारे,तसेच भीम आर्मी कार्यकर्ते करण गायकवाड,आबा नामदास,सौरभ गायकवाड,आतिश गायकवाड,विकास गायकवाड , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0 Comments