#Karunde जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती कारूंडे शाळेत भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती (कारूंडे) तालुका माळशिरस येथील शाळेमध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.




यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नवरत्न ज्वेलर्स नातेपुते येथील औदुंबर कदम शेठजी हे होते तर प्रमुख पाहुणे  मेजर गुलाब करे हे होते.


या कार्यक्रमाचे ध्वजारोहण अध्यक्ष व पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक कवायतीने झाली. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच व्यासपीठावरील मान्यवर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रीतीने मानवी मनोरे चे सादरीकरण केले,.  शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा  भाषणे केली. भाषणे केलेल्या सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मेजर गुलाब करे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला  बक्षीसे दिली.


अतिथी मेजर गुलाब करे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.,पालकांचे मनोगत व्यक्त करताना वस्तीवरील शिक्षण प्रेमी सुरेश  लोंढे  यांनी शाळेच्या अडीअडचणी आपल्या मनोगत मधून व्यक्त केल्या .शाळेच्या गरजा लक्षात घेता कार्यक्रमाचे अध्यक्ष औदुंबर कदम शेठजी यांनी शाळेला नावाची कमान करून देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर शाळेचे माजी विद्यार्थी मनोज गोसावी  व विजय बुधावले यांनी शाळेला गेट तयार करून देण्याचे मान्य केले.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मेजर गुलाब करे यांनी शाळेसाठी एक हजार रुपये देणगी दिली.
स्वप्नजीत पवार यांनी शाळेतील सर्व  विद्यार्थ्यांसाठी शंभर पाणी वह्या शाळेला भेट दिल्या.


यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ लोंढे , मनोज गोसावी , विजय बुधावले व वस्तीवरील सर्व ग्रामस्थ पालक,  कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अभिमन्यू लोंढे सर यांनी केले.आभार प्रदर्शन सहशिक्षिका श्रीमती निकम मॅडम यांनी  देणगी देणाऱ्या सर्व दात्यांचे व पालकांचे  आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम