#Natepute बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाकडून नातेपुतेत निषेध
महादरबार न्यूज नेटवर्क -
बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गट यांच्यावतीने नातेपुते तालुका माळशिरस येथील अण्णाभाऊ साठे चौकात निषेध आंदोलन करून शासनास निवेदन देण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने नातेपुते येथील मेन पेठ येथील शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आंबेडकर चौकातून अण्णाभाऊ साठे चौकात येऊन लहान मुलीवर झालेल्या अत्याचार अत्याचाराच्या विरुद्ध आरोपी अक्षय शिंदे यास कडक शासन झाले पाहिजे व परत अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले व शिवसेनेच्या वतीने नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि महारुद्र परजणे व महसूल चे गोरख ढोबळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, नातेपुते शहर प्रमुख पै. निखिल पलंगे, शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष गोरे, तालुका संघटक समीर शेख ,जिल्हा गटप्रमुख अनिल दडस ,किशोर पलंगे ,दत्तामाई,
रुपेश इंगोले, सनी पलंगे संजय दनाने राहुल अडगळे ,अमोल लाळगे, सोनू पलंगे, दीपराज पलंगे, केदार पलंगे ,साहिल पलंगे, वनराज पलंगे ,मनोज पलंगे ,दहीगाव शाखाप्रमुख विजय ढेकळे, पिराळे शाखाप्रमुख आकाश खिलारे ,शंकर कर्चे, सागर कर्चे, वैजनाथ खताळ, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment