#Chiplun धामापुर पंचायत समिती गणात ऋण फाऊंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा सांगता कार्यक्रम सोमवार २६ ऑगस्ट रोजी धामापूर प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये संगमेश्वर तालुक्याच्या तहसिलदार सौ.अमृता साबळे मॅडम,आमदार शेखर निकम यांच्या सुकन्या सई निकम सुर्वे, ऋण फाऊंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती.अंकिता ताई चव्हाण यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


सचिव श्री.विलास चव्हाण यांनी ऋण फाऊंडेशन विषयी माहिती देऊन फाऊंडेशन ची पुढील ध्येय धोरणे सांगितली. तहसिलदार साबळे मॅडम व सई निकम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी कार्याध्यक्ष श्री. अक्षय चव्हाण व शेखर उकार्डे यांनी मनोगत मांडले.सुशीलजी भायजे यांनी गावाच्या वतीने मान्यवर व ऋण फाऊंडेशन चे आभार मानले.

जनतेचे काही तरी ऋण आपल्यावर आहेत तेचं ऋण घेऊन आपणं देखील समाजाप्रती काहीतरी केले पाहिजे ह्याचं भावनेतून स्थापन झालेले ऋण फाउंडेशन,लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.नानासाहेब चव्हाण व इतर ऋण दाते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अनेक छोटे मोठे उपक्रम राबवत आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने ऋण फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी जिल्हा उपाध्यक्षा,मा.सरपंच कळंबूशी श्रीमती.अंकिता ताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशन तर्फे विभागातील खेड्या पाड्यातील एकूण २५ प्राथमिक शाळा व १ हायस्कूल च्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.सुशिलजी भायजे,धामापूर चे सरपंच श्री.शांताराम भायजे, आंबव गावचे सरपंच श्री.शेखर उकार्डे,तुकाराम मेस्त्री,गणपत चव्हाण,सुधीर चव्हाण,मनोहर चव्हाण,विनायक चव्हाण,दत्ताराम म्हापरले,प्रवीण लांबे,महेश घाणेकर, प्रथमेश चव्हाण, धुलप गुरुजी,शाळेच्या मुख्यद्यापिका,शालेय कमिटी अध्यक्ष,सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम