महादरबार न्यूज नेटवर्क - ओबीसी चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून औसा विधानसभेसाठी आकाश पुजारी यांनी नामांकन अर्ज दाखल केला.
त्यामुळे औसा मतदारसंघांमध्ये प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत. मतदारसंघांमध्ये आकाश पुजारी यांची चर्चा असून महायुतीचे अभिमन्यू पवार आणि ओबीसीचे आकाश पुजारी यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. औसा विधानसभेची निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मी आज शपथ घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. औसा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, वंचित, बहुजनांसाठी मी निवडणूक लढतोय. मी निवडून आल्यावर या औसाचा नक्कीच कायापालट करीन व या औसाकारांनी मला संधी द्यावी मी देशात सर्वांत समृद्ध मतदारसंघ औसा करून दाखवतो. देशपातळीवर औसा ची उंची वाढवणार आहे.
-आकाश पुजारी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, औसा विधानसभा
0 Comments