महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर मतदार संघात आपल्या विकास कामांवर जनतेचा विश्वास संपादन करणारे विद्यमान शेखर निकम यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्ष एका अनोख्या उत्साहात वावरताना दिसत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांनी लावलेली अभुतपुर्व उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
आजवर जनतेची कामे करत आलो, यापुढे असेच काम करत राहणार हा विश्वास आ. शेखर निकम उपस्थित जनसमुदायाला देत होते.
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण आणि समाजसेवा करता येते हे आ. शेखर निकम यांनी आपल्या कार्यकाळात दाखवून दिले आहे. असे परखड मत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.
महिला वर्ग पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन रणरणत्या उन्हात कुटुंबाची तहान भागवण्यासाठी धडपड करीत होत्या. या त्रासातून महिलांना मुक्त करत त्यांच्या डोक्यावरील दुर्भिक्षेचे हंडे उतरवीले. म्हणून आजच्या कार्यक्रमात आम्ही महिला उपस्थित आहोत असे मत काही महिलांनी व्यक्त केले.
निष्ठावंत कार्यकर्ते , उपस्थित युवक, युवती, पुरुष महिला वर्ग भर उन्हातही शेखर निकम यांच्या प्रेमापायी हसतमुख चेहऱ्याने वावरत होते. गेले भावी काळात आमदारकी अर्ज दाखल करताना केव्हाच भव्य दिव्य असा जनसमुदाय नव्हता पहिल्यांदाच चिपळूण शहरात व कोकणातील लोकप्रिय आमदार यांच्यावर असलेलं प्रेम, जिवाभावाचे नाते व पुढील काळात अपेक्षीत विकास या अपेक्षा आधारे जीवा भावाचे सहकारी उपस्थित होते.
मोठ्या जल्लोषात शक्ती प्रदर्शन करून आगामी काळात जोरदार टक्कर होणार याचे सूतोवाच करण्यात आले.
0 Comments