#Solapur मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पेड न्यूजवर करडी नजर ठेवावी - निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम

जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समितीला निवडणूक खर्च निरीक्षक यांची भेट व कामकाजाची पाहणी

सोलापूरदि. 30 (जिमाका) :  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीने निर्भय व निष्पक्ष पदधतीने मुद्रित व  इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्यूजसह सोशल मिडीयाच्या वापरावरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम श्रीमनलाल यांनी दिले.


यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्केसमिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाणसदस्य डॉ श्रीराम राऊतअंबादास यादवरफिक शेखगणेश बिराजदारसचिन सोनवणे आणि समीर मुलानी आदी उपस्थित होते.

निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असून समाज माध्यमाद्वारे होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. वृत्तपत्रात येणाऱ्या संशयीत पेड न्यूज शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ठ करावा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे समितीने कामकाज करावे. समितीने दैनंदिन पेड न्यूजचा अहवाल खर्च समितीला सादर करावा असेही श्री. मीना यांनी सांगितले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर उत्तरसोलापूर शहर मध्यअक्कलकोट व दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक श्री मीना यांनी आज जिल्हा माध्यम कक्ष व एमसीएमसी समिती कक्षाला भेट दिली.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या टीव्ही युनिट च्या कामकाजाची माहिती,नोंदी व रिपोर्ट कशा पद्धतीने दिला जातो याविषयी युनिट चे प्रमुख रफिक शेख आणि सचिन सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ श्रीराम राउत यांनी सोशल मिडिया वर राजकीय पक्ष व उमेदवाराचा छुपा खर्च कशा पद्धतीने काढला जातो याची सविस्तर माहिती दिली. अंबादास यादव व गणेश बिराजदार यांनी पेड न्यूज कात्रणे आणि दैनंदिन निवडणूक कार्यालायाला देण्यात येणाऱ्या अहवालाविषयी सविस्तर माहिती दिली.

जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून उमेदवारांच्या प्रचार जाहिरातीराजकीय जाहिराती यांचे प्रमाणीकरण करण्याचे कार्यवाही केली जाते. पेड न्यूज व जाहिरात पूर्व प्रामाणिकरणाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले असून प्रिंटइलेक्ट्रॉनिक पोस्टसोशल मीडियातील प्रतिनिधीची या अनुषंगाने कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांना पेड न्यूज व जाहिरात पूर्वप्रमानीकरण याची माहिती देण्यात आल्याची माहिती समिती सदस्य सचिव श्री. सोनटक्के यांनी तसेच सहाय्यक नोडल अधिकारी श्री. चव्हाण यांनी दिली.

यावेळी माध्यम कक्षातील आप्पा सरवळे सुभाष भोपळे कासीम जमादारनागेश क्षिरसागरअरविंद महालेकृष्णा घंटे,शरद नलवडेमिलिंद भिंगारेईलीहास ईनामदारसंजय घोडकेदिलीप कोकाटेभाऊसाहेब चोरमलेईकबाल भाईजाननागेश दंतकाळेप्रविण चव्हाणअमोल घाडगेअतिश हावळे आणि प्रविण बर्दापूरकर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत